Uncategorized

“आहात का तुम्ही शिवाजी?”


चंद्रकोर लावून तुम्ही शिवाजी झालात का? गाडीवर महाराजांची नाव व पाठी लावून तुम्ही शिवाजी झालात का?
शिवाजींचा इतिहास जाणून घेतला म्हणून तुम्ही शिवाजी झालात का?
महाराजांसारखी दाढी वाढवून तुम्ही शिवाजी झालात का?

जर असं असेल तर खरा शिवाजी तुम्ही कधीच समजला नाही…
जो स्त्रियांचा आदर करतो, तो शिवाजी…
जो आईसाहेबांचा हुकूम मानतो तोच शिवाजी…
जो गुरूंच्या आज्ञेत असतो, तो शिवाजी
जो कोणालाही नं घाबरता, निडर पणे जगतो तो शिवाजी
जो मराठी असल्याचा अभिमान बाळगतो तो शिवाजी…
जो परस्त्री, माता, बहीण समान असं म्हणतो तो शिवाजी

आता सांगा…आहात का तुम्ही शिवाजी?

आज सर्वांनाच शिवाजी महाराज व्हायचं आहे, पण मावळे व्ह्यायला कोणीही तयार नाही.

एक माणूस म्हणून मी महाराजांसारखा दिसतो का? हे बघण्यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वागतो का हे बघा

🚩।।जय शिवराय।। 🚩

~ Ayesha Ghadigaonkar

Marathi Translation :- Sunil Zadane